गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रधुभाव मोठ्या प्रमाणात वाढत असून जिल्ह्यात अनेक रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. अश्यातच एक रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी रुग्णाला भरती करून घेतले नाही. म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात तोडफोड करून डॉक्टरांना शिविगाळ व मारण्याची धमकी दिली.
तोडफोड करून ५० हजार रूपयांचे नुकसान-
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत असलेल्या खैरलांजी मार्गावर दया हॉस्पिटलमध्ये १३ एप्रिलच्या रात्री १०:३० वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. महेंद्र परिहार (रा. बोदा, अत्री,) संजय प्रतीचंद येडे, अनिल प्रतीचंड येड व जितेंद्र प्रीतीचंद येडे हे तिन्ही (रा. पार्डी, नागपूर) रूग्णाला बेशुध्दअवस्थेत घेउन आले. यावेळी डॉ. संदीप विठ्ठलराव मेश्राम यांनी रूग्णाला तपासून रूग्ण गंभीर आहे. व आपल्याकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे गोंदियाला घेउन जा, असा सल्ला दिला. यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णाला भरती का करीत नाही म्हणुन तक्रारदाराला थापड मारली तसेच हॉस्पिटलमधिल कॅबिनचे काच फोडले. ऑक्सिजन सिलींडरला लाथ मारून खाली पाडले व रूग्णाच्या बेडला लाथ मारून दवाखान्यातील काचेच्या दाराची तोडफोड करून ५० हजार रूपयांचे नुकसान केले.