गोंदिया- रावणवाडी पोलिसांनी खुनाच्या प्रकरणातील आरोपीला २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. या पोलीस ठाण्यांतर्गत काटी येथील भुमेश्वर रघुजी चौधरी या व्यक्तीचा मृतदेह आरोग्य केंद्र परिसरात आढळला होता. या व्यक्तीच्या खुनप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोंदिया: खुनाच्या प्रकरणातील आरोपीला २४ तासात बेड्या - Latest Gondia news
खुनाची घटना ८ जुलैला रोजी समोर आली होती. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेत खून झाल्याचे निष्पन्न झाले.
खुनाची घटना ८ जुलैला रोजी समोर आली होती. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेत खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी अनिल राधेलाल भगत विरोधात रावणवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
भुमेश्वर चौधरी हे ७ जुलै रोजी काही कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. परंतु उशिरा रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांचा परिसरात शोधाशोध घेतला असता ते सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी काटी आरोग्य केंद्र परिसरात मृत अवस्थेत भुमेश्वर चौधरी यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. संशयितरित्या मृतदेह मिळाल्याने पोलिसांनी आपले चक्र फिरवले. त्यानंतर केलेल्या तपासात आरोपीने खून केल्याची कबुली दिली.