गोंदिया - हिंदू बांधवांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात अनेक समाज संघटनांनी एकत्र रामनगर येथील श्रीराम मंदिरातून भव्य दुचाकी रॅली काढली. यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.
गोंदियात रामनवमीनिमित्त शहर झाले 'भगवे'; भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन - ram
अनेक दुचाकींवर भगवे झेंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून शहरातील विविध भागातून ही रॅली फिरवण्यात आली.
गोंदियात रामनवमीनिमित्त शहर झाले 'भगवे'
अनेक दुचाकींवर भगवे झेंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून शहरातील विविध भागातून ही रॅली फिरवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणावरून ही बाईक रॅली जात असे त्या ठिकाणावरून संपूर्ण परिसर भगवामय दिसत होता. संपूर्ण शहरात दुचाकी रॅली भ्रमण करून श्रीराम मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला. हिंदू बांधवांनी 'एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्री राम'चा नारा दिला.