गोंदिया- रेल्वे स्थानकात आराम करत असलेल्या प्रवाशाची बॅग चोरट्याने लंपास केली. हा चोर तेथील सीसीटीव्हीत कैद झाला. रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्याला काही तासातच गजाआड केले. संदीप मोनीराम कुंभरे (रा. सोनेगाव ता. साकोली जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
रेल्वे प्रवाशाची बॅग चोरणारा आरपीएफकडून काही तासात गजाआड - Chandrapur railway
रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने वेळ वाया न घालविता सीसीटीव्ही पाहिला. तेव्हा आरोपी बॅग नेताना दिसून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिसरात शोध घेऊन आरोपीला गजाआड केले.
रेल्वे प्रवासी रुपेश पानावत (रा. गोंडपिपरी) हे चंद्रपूरला जाण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर रात्री पोहोचले. मात्र चंद्रपूरला जाण्यासाठी रात्रीची रेल्वे नव्हती, हे त्यांना माहित नव्हते. सकाळी ७ वाजता चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे ते रात्री रेल्वे स्थानकावर थांबले.
मध्यरात्री दरम्यान आरोपीने संधी साधून पानावत यांची बॅग लंपास केली. पानावत यांना लक्षात येताच त्यांनी रेल्वे स्थानकावर रात्री गस्त घालत असलेल्या रेल्वेच्या जवानांना माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने वेळ वाया न घालविता सीसीटीव्ही पाहिला. तेव्हा आरोपी बॅग नेताना दिसून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिसरात शोध घेऊन आरोपीला गजाआड केले.