गोंदिया- गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या एका अट्टल चोराला गोंदिया रेल्वे पोलिसांच्या 'टास्क टीम' ने केली अटक केली आहे. राजू अखिलेश यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर ही त्याचा अनेक गुन्हात समावेश असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.
प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी केली अटक - चोर
गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकिट हिसकावून पळ काढणाऱ्या एका अट्टल चोराला गोंदिया रेल्वे पोलिसांच्या 'टास्क टीम' ने केली अटक केली आहे. राजू अखिलेश यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर ही त्याचा अनेक गुन्हात समावेश असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.
तक्रारदार पवित्र कुमार राठिया हे गोंदियावरुन सांगलीला निघाले होते. गाडीची प्रतिक्षा करत ते प्लॅट फॉर्मवर थांबले होते. तेव्हा आरोपी राजू यादव याने त्यांना बोलण्यात गुंग करुन त्यांचे पाकिट हिसकावून पळ काढत असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपी राजू यादव हा अट्टल पाकिट चोर असून तो अनेक गुन्हात शामिल असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने, यावर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांची टास्क टीम नेमली आहे.