गोंदिया - अवैधरित्या बनावटी देशी मद्य तयार केल्या जात असलेल्या फार्म हाऊसवर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यात एकुण 60 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून यातील एक आरोपी फरार झाला आहे.
गोदिंयात अवैध बनावटी देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; दोघांवर गुन्हा दाखल - मुद्देमाल
फार्म हाऊसवर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यात एकुण 60 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तालुक्यातील पांढराबोडी येथील फार्म हाउसवर अवैधरित्या बनावटी देशी मद्य तयार केले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
तालुक्यातील पांढराबोडी येथील फार्म हाउसवर अवैधरित्या बनावटी देशी मद्य तयार केले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यात १०० लीटर स्पिरिट व १८० मिली क्षमतेच्या एकुण ८८६ बनावट मद्याच्या बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या फिरकी संत्रा या नावाचे लेबल असलेल्या १७०० देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ३५०० बुच, १ बाटली अर्क, इलेक्ट्रीक मोटार, स्पिरीटच्या वासाचे २०० लीटर क्षमतेचा १ व २० लीटर क्षमतेचे ५ प्लास्टिकचे रिकामे ड्रम व ४ पाण्याचे रिकामे कॅन इत्यादी मुद्येमाल जप्त करण्यात आला. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ६०,८३० रू. इतकी आहे.
सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्रप्रसाद ढेकवार आणि धर्मेंद्र सिताराम डहारे या दोन आरोपींविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र सिताराम डहारे हा फरार असून त्याचा शोध सुरु असुन पुढील तपास सुरू आहे.