महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात एसआरपीएफच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागून गर्भवती महिला जखमी

एसआरपीएफ जवानांच्या गोळीबार प्रशिक्षणादरम्यान सुटलेली गोळी लागून एक गर्भवती महिला जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सितेपार गावात ही घटना घडली.

gondia
गोंदियात गोळीबार प्रशिक्षणादरम्यान सुटलेली गोळी लागून गर्भवती महिला जखमी

By

Published : Jun 6, 2020, 10:04 PM IST

गोंदिया - आमगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे नागपूर एसआरपीएफ जवानांचे गोळीबार प्रशिक्षण आज दुपारी सुरू होते. या प्रशिक्षणादरम्यान गोळी सुटून गर्भवती महिला जखमी झाली आहे. वर्षा पटले असे जखमी महिलेचे नाव आहे.

आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध परिसरातील डोंगरगाव येथे एसआरपीएफ जवानांचे गेल्या ४ दिवसापासून गोळीबार प्रशिक्षण सत्र सुरू आहे. या सरावादरम्यान जवानांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान आज, गोळीबार कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.

यावेळी हवेत सुटलेली बंदुकीची गोळी प्रशिक्षणाच्या स्थळापासून दीड ते दोन किमी अंतरावरील सितेपार गावातील वर्षा सुरेश पटले या महिलेच्या पायाला लागली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्या महिलेला उपचारासाठी आमगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार करून घरी सोडण्यात आले.

यापूर्वीही डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारची घटना घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details