गोंदिया - माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचे आज एक वेगळेच रूप जनतेला पाहायला मिळाले. रस्त्यामध्ये अपघात झालेल्या दोघांची मदत करत त्यांना लवकर उपचार कसे मिळतील यासाठी ते प्रयत्नशील दिसले. ही घटना कामठा ते काठी या मार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल अपघातग्रस्तांसाठी झाले देवदूत - gondia accident
प्रफुल पटेल काठी येथे सभेकरीता जात असताना त्यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी स्वतः गाडीतून उतरत वाहतूक कोंडी दूर करीत अपघातग्रस्तांना मदत केली.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल
प्रफुल पटेल काठी येथे सभेकरीता जात असताना त्यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी स्वतः गाडीतून उतरत वाहतूक कोंडी दूर करीत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवण्याची सोय त्यांनी करून दिली.