महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क, आघाडीचे सरकार येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्नीसह गोंदियात मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन होणार असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 11:01 AM IST

गोंदिया - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्नीसह गोंदियात मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन होणार असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

मागील ५ वर्षात भाजप सरकारने काहीही विकास केला नाही. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले होते. मात्र, भाजपने विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details