गोंदिया - जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसुन येत आहे. विशेष म्हणजे या घटनेतील अनेक आरोपी संधीचा लाभ घेत पसार होत असल्याचेही समोर आले आहे. १ जूनला घडलेल्या देवरी येथील अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरण गाजत असतानाच आता आमगाव तालुक्यातही असेच एक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात पीडितेची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे या अत्याचाराबाबत पीडितेच्या पालकांनी पत्रकार परिषदेत घेऊन न्याय मागितला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार; पीडितेने घेतली पत्रकार परिषद - Gondia district
आमगाव तालुक्यातील पीडीत मुलगी १० वी च्या वर्गात शिकत होती. दरम्यान रंजित दहिकर २४ वर्ष (रा. कामठा) या तरुणाने पीडितेच्या आई-वडिलांशी असलेल्या संपर्कावरून तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अत्याचार केला. हे प्रकरण मागील २ वर्षापासून सुरू आहे. विशेष म्हणजे या कालावधीत पीडितेने विरोधही केला. मात्र, त्या युवकाने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने ही बाब लपवून ठेवली होती.
आमगाव तालुक्यातील पीडित मुलगी १० वी च्या वर्गात शिकत होती. दरम्यान, रंजित दहिकर २४ वर्ष या तरुणाने पीडितेच्या आई-वडिलांशी असलेल्या संपर्कावरून तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अत्याचार केला. हे प्रकरण मागील २ वर्षापासून सुरू आहे. विशेष म्हणजे या कालावधीत पीडितेने विरोधही केला. मात्र, त्या युवकाने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने ही बाब लपवून ठेवली. त्यातच २७ मे रोजी पीडितेचे आई-वडिल घरी नसताना आरोपी तिला बाहेर घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी आई-वडील घरी परत आल्यानंतर मुलगी दिसली नाही. नंतर ती परत आली आणि अत्याचाराच्या प्रकरणाचे बिंग फुटले.
मागच्या २ वर्षापासुन तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची सर्व हकीकत पीडितेने आई-वडिलांना सांगितली. यानंतर आई-वडील तक्रार करण्यासाठी आमगाव पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांना दिवसभर बसवून ठेवले. मात्र, तक्रार घेतली नसल्याची माहिती आयोजीत पत्र परिषदेत पीडितेसह तिच्या आई-वडिलांनी दिली. विशेष म्हणजे त्या युवकाचे अवैध दारूचा व्यवसाय असून पोलिसांशी त्याची ओळख आहे. त्यामुळे पोलीस तक्रार घेण्यास नकार देत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत पीडितेने केला आहे. एकीकडे देवरी येथील प्रकरण गाजत असताना आमगाव तालुक्यातील प्रकरण समोर आले आहे. पोलीस आतातरी पीडितेला न्याय देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.