गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ एप्रिलला मोदींची सभा गोंदिया येथील बालाघाट रोड 'टी पॉईंट' येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला राज्यात पहिल्या टप्यात मतदान होणार आहे.
लोकसभा रणकंदन : गोंदियात पंतप्रधान मोदींची ३ एप्रिलला जाहीर सभा - भाजप
३ एप्रिलला मोदींची सभा गोंदिया येथील बालाघाट रोड 'टी पॉईंट' येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
येत्या ११ एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका होणार असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचारला सुरूवात केली आहे. आपला उमेदवार या निवडणुकीत निवडून आला पाहिजे, यासाठी अनेक पक्षांकडून स्टार प्रचारक प्रचाराला येणार आहेत. भंडारा-गोंदियामध्ये दिग्गज नेत्यांना व स्टार प्रचारकांना सभेला आणून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा सर्वच पक्षांचा मानस आहे.
भारतीय जनता पक्षाने ३ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गोंदिया येथे आयोजित केली आहे. या अगोदर नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गोंदियाला आले होते. त्यामुळे गोंदियातील ४ विधानसभा मतदारसंघातून भाजपला ३ ठिकाणी यश मिळवण्यात यश आले होते.