गोंदिया- सतराव्या लोकसभेसाठी ११ एप्रिलला राज्यात पहिल्या टप्यात मतदान होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधनीला व प्रचारला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजप प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३ एप्रिलला गोंदियात सभा होणार आहे. शहरातील बालाघाट रोड टी पॉईंटला संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गोंदियात ३ एप्रिलला नरेंद्र मोदींची सभा - गोंदिया
भाजप प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३ एप्रिलला गोंदियात सभा होणार आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. या ठिकाणी सर्व पक्षांनी आपल्या प्रचारला सुरवात केली आहे. आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, यासाठी पक्षांकडून भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या नेत्यांना व स्टारप्रचारकांना सभेला आणून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेकजण सभा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोंदियाला आले होते. त्यावेळी मोदीलाट सुरू होती. गोंदिया येथील ४ विधानसभेमधून भाजपला ३ विधानसभा जागेवर विजयी मिळवण्यात यश आले होते. मात्र, गोंदिया विधानसभेमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे पुन्हा मोदीलाट चालणार का? तसेच पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.