गोंदिया - कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन घोषित होताच भंडारा-गोंदिया जिल्यातील जे लोक जिथे अडकून पडले आहेत. अशा लोकांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे सदस्य आमदार परिणय फुके यांनी एक वेब लिंक तयार केली आहे. सोशल मीडियावर ही लिंक व्हायरल केली असून दोन दिवसांत ५ हजारांवर लोकांनी या लिंकवर माहिती दिली आहे.
सरकार तयार नसेल तर स्व-खर्चाने लोकांना परत आणणार - आमदार फुके - गोंदिया कोरोना बातमी
लोकांना जिल्ह्यात आणून देण्यास राज्य सरकार तयार होत नसेल, तर मी स्वतः आपल्या दोन्ही जिल्ह्यातील लोकांना स्व-खर्चाने परत आणणार, अशी ग्वाही आमदार फुके यांनी दिली आहे.
याकरिता आमदार फुके यांनी https://forms.gle/BmN243naScCiKup17 ही लिंक तयार केली आहे. आपण आपल्या मोबाईलवरदेखील यात माहिती भरून आपण कुठे आहेत आणि गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कोणत्या गावात आपल्याला परत यायचा आहे. याची माहिती मोबाईल नंबरसह अपलोड केल्यास आपल्याला मदतीचा कॉल येईल. सोबतच ह्या लिंकवर आलेली सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल आणि राज्य सरकारला देण्यात येईल. मात्र, या लोकांना जिल्ह्यात आणून देण्यास राज्य सरकार तयार होत नसेल, तर मी स्वतः आपल्या दोन्ही जिल्ह्यातील लोकांना स्व-खर्चाने परत आणणार, अशी ग्वाही आमदार फुके यांनी दिली आहे. या लिंकसोबतच चार हेल्पलाईन नंबरदेखील दिले आहेत.
परिणय फुके यांनी जारी केलेले हेल्प लाईन क्रमांक -
- 9860640454
- 7745826200
- 9503034490
- 8668266990
- 9423323114