महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबा महोत्सवात जालनेकरांनी चाखली रत्नागिरीच्या हापूसची चव

या आंबा महोत्सवात फळाविषयी माहिती आणि अस्सल फळ ओळखण्याची पद्धत याविषयी देखील दळवी ग्राहकांना माहिती देत आहेत. आंबा महोत्सवांमध्ये फक्त रत्नागिरी येथीलच दहा ते बारा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सुमारे दोनशे रुपये डझन पासून सहाशे रुपये डझन पर्यंत वेगवेगळ्या गुणवत्तेचे आंबे प्रदर्शनांमध्ये पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आंबा महोत्सव; जालनेकरांचा रत्नागिरीच्या हापूसवर ताव

By

Published : Jun 2, 2019, 9:03 PM IST

जालना -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये समस्त जालनेकर रत्नागिरीच्या हापूस आंब्यावर ताव मारताना दिसत आहेत. रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शेतकऱ्यांची टीम जालन्यात आली आहे.

आंबा महोत्सव; जालनेकरांचा रत्नागिरीच्या हापूसवर ताव
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने शनिवारपासून जालन्यात आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. फळांचा राजा आंबा आणि त्यामध्ये ही कोकणातील हापूस आंबा मराठवाड्यामध्ये दुर्मिळ आहे. जो हापूस मिळतो त्यामध्ये कर्नाटकमधील हापुस आंबा मिसळून ग्राहकांना विक्री केली जाते. त्यामुळे स्वादिष्ट आणि सुवासिक हापूस आंबा जनतेला खायलाच मिळत नाही. तो उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत होती. त्यावर राज्य मंत्री खोतकर यांनी रत्नागिरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांच्याशी संपर्क साधून जालन्यात या आंबा महोत्सवाचे आयोजन केले. शनिवारपासून या आंबा महोत्सवांमध्ये शेकडो पेट्या आंबे विकले गेले.

या आंबा महोत्सवात फळाविषयी माहिती आणि अस्सल फळ ओळखण्याची पद्धत याविषयी देखील दळवी ग्राहकांना माहिती देत आहेत. आंबा महोत्सवांमध्ये फक्त रत्नागिरी येथीलच दहा ते बारा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सुमारे दोनशे रुपये डझन पासून सहाशे रुपये डझन पर्यंत वेगवेगळ्या गुणवत्तेचे आंबे प्रदर्शनांमध्ये पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आज परत रत्नागिरीतून आंबा मागवण्यात आल्याची माहितीही दळवी यांनी दिली.


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details