गोंदिया - धान उत्पादक जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, यासाठी पहिल्यांदाच क्षेत्रीय जैवीक शेती केंद्र नागपूर यांच्या माध्यमातून गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या अभ्यासक्रमाची महाविद्यालयात सुरवात करण्यात आली.
हेही वाचा... आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयात पदवीधारक असलेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो आणि सेंद्रिय शेतीचे शिक्षण घेऊ शकतो. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आणी कृषक लोकांना जैविक शेतीची माहिती, शेती उपयोगास येतील अशी तंत्रविज्ञानाबद्दल सविस्तर माहिती पुरवली जाणार आहे.