गोंदिया - आंध्रप्रदेशातील 100 तरुण कामगार गोंदियातील एका कंपनीत काम करत होते. मात्र, लॉकडाऊनंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. सर्व कंपन्या बंद पडल्या हाताला काम नसल्यामुळे परिणामी उपाशी रहावे लागत असल्यामुळे या तरुणांनी घराची वाट धरली आहे. गोंदिया ते आंध्रप्रदेश हे 100 तरुण पायी निघाले आहेत.
गोंदियातून शंभर कामगारांचा आंध्रप्रदेशच्या दिशेने प्रवास; तब्बल 900 किमी पायी अंतर कापणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता दुसऱ्या टप्याचा लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कामधंदे बंद आहेत. आंध्रप्रदेशातील शंभरावर तरुणांनी पहिल्या लॉकडाऊच्या काळात कसेबेसे दिवस काढल्यानंतर आता त्यांनी घराची वाट धरली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता दुसऱ्या टप्प्याचा लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कामधंदे बंद आहेत. आंध्रप्रदेशातील शंभरावर तरुणांनी पहिल्या लॉकडाऊच्या काळात कसेबेसे दिवस काढल्यानंतर आता त्यांनी घराची वाट धरली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोकही चिंतेत आहेत व सतत फोन करून घरी यायला सांगत असून जसे जमेल तसे आपल्या गावी परत या असे घरच्यांचे आग्रह आहे. त्यामुळे आज आंध्रप्रदेशातील शंभरच्या वर तरुण अंधरप्रदेश येथे आपल्या गावी जाण्यासाठी पायी पायीच प्रवास सुरू केला आहे. तर रस्त्यात काही साधन मिळाले तर दोन दिवसात आपल्या गावी पोहचू नाहीतर पायी-पायी गेलो तर पाच दिवस लागणार आहेत.