महाराष्ट्र

maharashtra

पोलीस भरतीत एकही जागा नाही, ओबीसी तरुणांनी गोदिंयात काढला मोर्चा

By

Published : Sep 12, 2019, 9:09 PM IST

Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST

पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म 23 सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे.

आंदोलनकर्ते ओबीसी तरुण

गोदिंया -राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये 3 हजार 357 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, या भरतीत 6 जिल्ह्यांमध्ये इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आज (गुरुवारी) आंबेडकर चौक ते शहराचा मुख्य बाजार आणि चौकातून मोर्चा काढण्यात आला.

पोलीस भरतीत ओबीसी समाजाला कमी जागा असल्यामुळे गोदिंया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने आंदोलन केले...

हेही वाचा -महिला पोलीस अधीक्षकाने अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल

पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म 23 सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. तसेच सरकारने ज्या जिल्ह्यात ओबीसींची जागा नाही त्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या भरतीत ओबीसींना सामावून घ्यावे, अन्यथा ही भरती रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

हेही वाचा -उत्तरप्रदेशातील 'या' पोलीस ठाण्यात १९ वर्षांत फक्त २ गुन्ह्यांची नोंद

राज्यात 19 जिल्ह्यात शहर पोलीस, ग्रामीण पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस, अशा विविध विभागांमध्ये 3 हजार 357 पोलीस शिपाई पदाची भरती केली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन जाहिरात काढण्यात आली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गाला 19 टक्के आरक्षण दिले जाते. परंतु, 6 जिल्ह्यात होत असलेल्या पोलीस पदभरतीत ओबीसीला १ टक्केही जागा देण्यात आली नसल्याने हा ओबीसींवर अन्यायच आहे. तसेच बिंदू नामावलीनुसार ओबीसींना जागा मिळाव्या, यासाठी ओबीसींच्या विविध संघटनांच्यावतीने सरकारला निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती ओबीसी संघटनेने दिली आहे.

Last Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details