महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी बाजी मारेल - प्रफुल्ल पटेल - शिवस्वराज्य यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढीत पक्ष बळकटीवर भर दिला आहे. ही शिवस्वराज्य यात्रा नागपूरवरून होत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यात पोहोचली.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल

By

Published : Sep 11, 2019, 7:47 AM IST

Updated : Sep 11, 2019, 8:14 AM IST

गोंदिया- विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा जोर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकांशी संवाद साधण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे. ही शिवस्वराज्य यात्रा नागपूरवरून होत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यात पोहचली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित; भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढीत पक्ष बळकटीवर भर दिला आहे. ही शिवस्वराज्य यात्रा नागपूरवरून होत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यात पोहोचली. या यात्रेचे जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आले. या यात्रेत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सहभागी झाले. लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता जिल्ह्यात प्रत्येक पक्ष बळकटी करणाच्या कामाला लागला आहे. या यात्रेत सहभागी असलेले शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर यावेळी टीका केली.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल

गेल्या पाच वर्षात वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागातील बेरोजगारांचे शहराकडे स्थलांतर, जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योगधंदे यावर सरकारला घेरले तर, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी देखील राज्य व केंद्र सरकार वर टीका करीत या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागांसाठी आग्रही असून याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; खासदार अमोल कोल्हेंचा सवाल

Last Updated : Sep 11, 2019, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details