महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नक्षल सप्ताहाचा गोंदिया एसटी आगाराला लाखोंचा फटका; ३१ बस फेऱ्या रद्द - संजना पटले

नक्षल सप्ताहाच्या काळात सुरक्षेच्या कारणामुळे 31 बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या सीमांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

गोंदिया बसस्थानक

By

Published : Aug 1, 2019, 6:55 PM IST

गोंदिया- गोंदिया पीपल्स लिब्ररेशन गुर्रिला आर्मी तथा जनवादी क्रांतिकारी माओवादी संघटनेने २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत शहीद सप्ताहाचे आयोजन केले आहे. पोलीस-नक्षलवादी यांच्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या नक्षल्यांची आठवण म्हणुन नक्षल सप्ताहाचे आयोजन केले जाते. या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने सुरक्षेच्या कारणामुळे नक्षलप्रभावित तालुक्यातील ३१ बस फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती गोंदियाच्या आगारव्यवस्थापक संजना पटले यांनी दिली. पोलीस प्रशासनाकडून आंतरराज्य सीमांवर गस्त वाढवण्यात आली आहे.

नक्षल सप्ताहाचा एसटीला लाखोंचा फटका

नक्षल सप्ताहामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन गोंदिया एसटी महामंडळाने सालेकसा, बिजेपार, नवाटोला, चांदपूर, खोलगड, डोमाटोला परिसरात जाणा-या ३१ बसफे-या रद्द केल्या आहेत. एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मानवविकासच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील प्रवाशांना याचा त्रास होत आहे. नक्षल सप्ताहाचा अन्य वाहतुकीच्या साधनांवरही परिणाम झाला आहे. शाळकरी व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थांना देखील एसटीच्या फेऱ्या बंद असल्याचा फटका बसत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले आहे.

नक्षल सप्ताहादरम्यान कुठेही अनुचित घटना घडु नये, यासाठी अतिसंवेदनशील नक्षल भाग असलेल्या सालेकसा, देवरी, चिचगड व केशोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिसंवेदनशिल गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, गोंदिया जिल्हा पोलिसांनी देखील जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, गडचिरोली, आंध्र प्रदेश सीमांवर गस्त वाढविली आहे. सी-६० कमांडो व एसआरपीने तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details