गोंदिया - आज भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.
गोंदियात ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते ध्वजारोहण
गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच डॉ. फुके यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक व स्वातंत्रता सैनानी यांच्यासह इतर सन्माननीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच डॉ. फुके यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक व स्वातंत्रता सैनानी यांच्यासह इतर सन्माननीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. फुके यांनी मानवंदना स्वीकारत पोलीस पथकाचे निरीक्षण केले. त्यानंतर आपल्या भाषणातून त्यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
त्यानंतर फुके यांनी जम्मू काश्मीर बद्दल समाचार घेतला. आज काश्मीरमध्ये भारताचे प्रथमच ध्वजारोहण झाले. याचे श्रेय त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिले. तसेच आज भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या प्रसंगी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस शिपायांना पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.