नागपूर - विधानसभेचे हिवाळी नागपुरात सुरू आहे. यावेळी गोंदिया शहराचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील परिस्थिती मांडून ढासळत्या कायदा व्यवस्थेबाबतचा प्रश्न उपस्थित केला.
गोंदिया शहारापासून 5 किलोमीटर अंतरावर एका दलित तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेकडे गोंदिया शहराचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत सभागृहाचे लक्ष वेधले आहे. २ दिवसांपूर्वी सुद्धा एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याशिवाय महिनाभरापूर्वी सुद्धा २ अल्पवयीन तरुणांनी एका अल्पवयीन तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली होती. शहरात रेती माफिया आणि भू माफियांची दहशत असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले, असल्याचे आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले.