गोदिंया -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कारणाने मजूर आपापल्या गावी परत जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. महाराष्ट्रामधून छत्तीसगडला निघालेल्या लोकांची तपासणी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेले मजूर मिळेल, त्या साधनाने आपापल्या गावी जात आहेत. अशा गावी जाणाऱ्या मजूरांची तपासणी गोंदिया जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र-छत्तीगड सीमेवर करण्यात येत आहे. तपासणी करुन त्या मजूरांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधून आलेल्या लोकांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.