महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवंगत मनोहर भाई पटेल जयंती उत्सव; अभिनेता सुनिल शेट्टीसह सचिन पायलटांची उपस्थिती

शिक्षण महर्षी दिवंगत मनोहर भाई पटेल यांचा 114 व्या जयंतीनिमित्त, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील 13 प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व सिने अभिनेते सुनील शेट्टी प्रामुख्याने उपस्थित होते.

sunil shetti and sachin pilot
सचिन पायलट, अभिनेता सुनिल शेट्टी

By

Published : Feb 9, 2020, 8:38 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील शिक्षण महर्षी दिवंगत मनोहर भाई पटेल यांचा 114 व्या जयंतीनिमित्त, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील 13 प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व सिने अभिनेते सुनील शेट्टी प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षी 9 फेब्रुवारीला आयोजित या कार्यक्रमाकरिता देशातील दिग्गज नेते, उद्योगपती व सिने अभिनेते प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात तसेच यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार ही करण्यात आला.

दिवंगत मनोहर भाई पटेल जयंती उत्सव; अभिनेता सुनिल शेट्टीसह सचिन पायलटांची उपस्थिती

हेही वाचा -दत्तात्रय वारे गुरुजींचा परिसस्पर्श, घडवली देशातील पहिली 'झिरो एनर्जी' शाळा

आदित्य ठाकरे म्हणाले, "सरकार भलेही अच्छे दिन म्हणत नसेल, मात्र हे अच्छे लोगोकी सरकार नक्कीच आहे." त्यामुळे सरकार महाराष्ट्राच्या विकासाला गती नक्की देणार आहे. तसेच प्रफुल पटेल म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपचे काम पाहता भंडारा गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील विकासाचा कामाला गती मिळाले नाही. मात्र, आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून गती मिळणार आहे. यावेळी सिने अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील आपल्या प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉग मारत आलेल्या प्रेक्षकांची मन जिंकली.

हेही वाचा -प्रभू रामचंद्राचे नाव घायचे अन् आदर्श रावणाचा ठेवायचा, बच्चू कडूंचा लोणीकरांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details