गोंदिया - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या विधानसभा आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
Live Update
- आमगावमधून काँग्रेसचे सहसराम कारोटे 8200 मतांनी विजयी, भाजपच्या संजय पुराम यांचा केला पराभव
- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री राजकुमार बडोलेंचा पराभव, राष्ट्रवादी कोंग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे विधानसभेवर
- गोंदिया विधानसभा मतदारसंघातूनअपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी
- तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले 25 हजार 508 मतांनी विजयी
- गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष विनोद अग्रवाल आघाडीवर
- अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पंधराव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे 2 हजार 402 मतांनी आघाडीवर
- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे 1 हजार 395 मतांनी आघाडीवर, माजी मंत्री राजकुमार बडोलेंच्या अडचणी वाढल्या
- तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले 15 हजार 977 मतांनी आघाडीवर
- गोंदिया मतदारसंघात नवव्या फेरी अखेर अपक्ष विनोद अग्रवाल 15 हजार 922 मतांनी आघाडीवर, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोश
- आमगाव विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरी अखेर काँग्रेसचे सहसराम कारोटे 656 मतांनी पुढे
- अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आठव्या फेरीत 1094 मतांनी राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राजकुमार बडोले मागे
- गोंदिया मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल (13535) आघाडीवर, विद्यामान आमदार गोपालदास अग्रवाल मागे
- तिरोडा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर भाजपचे विजय रहांगडले 28651 मतांसह आघाडीवर
- आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सहसराम कारोटे आघाडीवर, भाजप पिछाडीवर
- गोंदिया मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल सहाव्या फेरी अखेर 11410 मतांनी आघाडीवर भाजपचे गोपालदास अग्रवाल मागे
- गोंदिया मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल पाचव्या फेरी अखेर 9673 आघाडीवर
- तिरोडा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे विजय रहांगडले (15251) आघाडीवर
- गोंदिया मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल 2386 मतांनी आघाडीवर असून भाजपचे गोपालदास अग्रवाल पिछाडीवर आहेत
- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
- तिरोडा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे विजय रहांगडले 3852 मतांसह आघाडीवर
- गोंदिया मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर अपक्ष विनोद अग्रवाल 5383 मतांनी पुढे
- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे (3101) आघाडीवर
- गोंदिया मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल (6065) पुढे
- तिरोडा मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले (3582) आघाडीवर
- आमगाव मतदारसंघात पहिल्या फेरीत ६०८ मतांनी काँग्रेसचे सहसराम कारोटे आघाडीवर
- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे (3293) आघाडीवर
- गोंदिया मतदारसंघात राउंडमध्ये अपक्ष विनोद अग्रवाल 3174 मतांनी पुढे
- गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात, लवकरच येईल निकाल हातात