गोंदिया- जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायत ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली होती. तर एका ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आजच्या मतमोजणीवरुन महविकास आघाडीला बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. तर गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र ननिर्माण सेनेने आपले खाते उघडले आहे. दोन ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे दोन सदस्य निवडून आले आहेत.
(गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल)
भाजपा- ६८
राष्ट्रवादी काँग्रेस- ५६
काँग्रेस- २९