गोंदिया - शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये काल (गुरुवारी) रात्री एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आत्महत्या कोणत्या कारणातून केली, याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहे. रोहिणी पवार ( 21 वर्ष, नागपूर ), तर आकाश छेतीया ( 22 वर्ष, गोंदिया ) अशी मृतकांची नावे आहेत.
Couple Suicide Gondia : गोंदियातील हॉटेलमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या - प्रेमी युगलाची आत्महत्या
गोंदियातील एका हॉटेलमध्ये प्रेमी युगलाचे मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
मृतक मुलाने हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला फोन दिली होती. मृतकाच्या आईने काही वेळातच हॉटेल गाठत वेटरच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. आकाश आणि रोहिणी हे दोन्ही बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे. ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे. गोंदियातील हॉटेल व्यावसायिक तरुण तरुणींना आपला स्वार्थ साधण्यासाठी खोली उपल्बध करून देत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा -Pandharpur crime : पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती; 138 किलो चंदन पोलिसांनी केले जप्त