गोंदिया - राज्यातील नागरिक जमेल त्या पद्धतीने सरकारला मदत करत आहेत. कुणी रस्त्यावर उतरून तर कुणी घरात राहून. तर कुणी अडकलेल्या लोकांना जेवण देत मदत करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी देखील सरकारला मदत करत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील आदर्श ग्राम कोहळीटोला वासियांनी गावभर फिरून वर्गणी गोळा केली आहे. ही जमलेली रक्कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडामध्ये पाठवणार आहेत.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलं अख्खं गाव; मुख्यमंत्री फंडामध्ये जमा करणार निधी - kohalitola ideal village cm fund
सडक अर्जुनी तालुक्यातील आदर्श ग्राम कोहळीटोला वासियांनी गावभर फिरून वर्गणी गोळा केली आहे. ते ही जमलेली रक्कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडामध्ये पाठवणार आहेत.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलं अख्खं गाव; मुख्यमंत्री फंडामध्ये जमा करणार निधी
गावातील लोकांनी कोरोना विषाणूपासून कसा बचाव कसा करावा, यासाठीचे मार्गदर्शन गावचे सरपंच आणि इतर नागरिक घरोघरी जावून करत आहेत. तसेच गावात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. गावातील लोकांनाही बाहेर जाण्यास बंदी केली आहे. या गावाने जे पाऊल उचलले आहे. ते प्रत्येक गावातील नागरिकांनी उचलावे, अशी इच्छा कोहळीटोला गावातील लोकांनी व्यक्त केली आहे.