महाराष्ट्र

maharashtra

आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या 24 वर्षीय नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

By

Published : Nov 7, 2019, 3:00 PM IST

किशोर आपल्या आजीच्या अस्थी विसर्जनासाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटावरील सोनी संगम येथे गेला होता. सोनी येथे वैनगंगा व चुलबंद या दोन नद्यांचा संगम आहे. दुपारी २ वाजता अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना किशोरसह त्याचे इतर तीन नातेवाईक आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले. किशोरला पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने किशोर नदीच्या पाण्यात वाहून गेला.

मृत किशोर रोहिदास शहारे

गोंदिया - आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या अर्जुनी मोरगाव येथील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ५ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील सोनी संगम येथे ही घटना घडली. दुर्गा चौकातील रहिवासी किशोर रोहिदास शहारे(वय 24) असे मृताचे नाव आहे.

आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या 24 वर्षीय नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

किशोर आपल्या आजीच्या अस्थी विसर्जनासाठी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या घाटावर सोनी संगम येथे गेला होता. सोनी येथे वैनगंगा आणि चुलबंद या दोन नद्यांचा संगम आहे. दुपारी २ वाजता अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना मृतक किशोरसह त्याचे इतर तीन नातेवाईक आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले. किशोरला पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही व तो नदीच्या पाण्यात वाहून गेला. नातेवाइकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही.

हेही वाचा - नाथसागर धरणाच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

लाखांदूर पोलीस ठाण्याला या बाबत माहिती देण्यात आली. नातेवाईक आणि पोलिसांनी मिळून नदीपात्रात पुन्हा एकदा शोध घेतला असता आज(7 नोव्हेंबर) सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अर्जुनी-मोरगाव येथे किशोरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोरच्या निधनाने शहारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरात घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details