गोंदिया - गोंदिया विधानसभा मतदार संघात अपक्ष विरूद्ध भाजप अशी लढत होती. अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपच्या गोपालदाल अग्रवालांचा पराभव करत विजय मिळवला आहे. विनोद अग्रवाल यांना ३२ हजार पेक्षा जास्त मतांची विजयी आघाडी मिळाली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी - गोंदिया विधानसभा मतदारसंघ रिजल्ट लाईव्ह
गोंदिया विधानसभा मतदार संघात अपक्ष विरूद्ध भाजप अशी लढत होती. अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपच्या गोपालदाल अग्रवालांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी
भाजपचे पराभूत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने विनोद अग्रवाल यांना डावलून काँग्रेसमधून आलेले विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली. मात्र, विनोद अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला