गोंदिया- जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान विशेष क्रॅकडाऊन मोहीम राबवली. अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.
आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे रायपूर वरून एका ट्रकमधून अवैध रित्या जनावरे डांबून नागपूरला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर देवरी पोलिसांनी देवरी - चीचगड रोड आणि देवरी - आमगाव रोड येथे नाकाबंदी केली. मात्र ट्रक चालकाला देवरीकडे येत असताना समोर पोलीस दिसताच त्याने आमगाव रोडवरून ट्रक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.