महाराष्ट्र

maharashtra

गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या धानाची उचल न झाल्याने रब्बी पिकांची खरेदी अडकली

By

Published : May 31, 2021, 5:52 PM IST

जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने रब्बी पिकांच्या धानाची खरेदी अद्यापही हव्या त्या प्रमाणात सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांचा धान्य आजही त्यांच्या घरीच पडून असून पावसाळी पिकांची लागवड कशी करायची? असा प्रश्न आता शेतकाऱ्यांना पडला आहे.

Kharif season grains procurement problem Gondia
खरीप हंगाम धान उचल समस्या गोंदिया

गोंदिया - जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने रब्बी पिकांच्या धानाची खरेदी अद्यापही हव्या त्या प्रमाणात सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांचा धान्य आजही त्यांच्या घरीच पडून असून पावसाळी पिकांची लागवड कशी करायची? असा प्रश्न आता शेतकाऱ्यांना पडला आहे.

माहिती देताना शेतकरी नेता, शेतकरी, माजी मुख्यमंत्री आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी

हेही वाचा -कटंगी डॅममध्ये मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालीम

या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्य प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रब्बी हंगामाची खरेदी वेळेवर सुरू न झाल्याने धान्य विक्रीचा प्रश्न

धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दर वर्षी खरीप हंगामात अडीच लक्ष हेकटर शेत जमिनीवर भात पिकाची लागवड करण्यात येते. तर रब्बी हंगामात जवळपास ६५ हजार हेकटर शेत जमिनीवर धान पिकाची लागवड केली जात असून, खरीप हंगामात आधारभूत किमतीने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला धान्य अद्यापही धान्य खरेदी केंद्रांवर पडून आहे. त्यामुळे, रब्बी हंगामाची खरेदी वेळेवर सुरू न झाल्याने धान्य कुठे विकायचा? असा प्रश्न गोंदिया जिल्ह्याच्या चुटिया गावातील शेतकरी कुवरलाल तुरकर याना पडला असून हा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना देखील पडला आहे.

कुवरलाल यांच्याकडे ४ एकर धानशेती असून त्यांनी खरीप हंगामात धान पिकाची लागवड करूत तो आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री केल. मात्र, शासनाने ७०० रुपये बोनस घोषित करून रक्कम दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, कुवरलाल यांनी लोकांकडून पैसे उसने घेत रब्बी पिकांची लागवड करीत उत्पादन घेतले, मात्र या वर्षी गोंदिया जिल्ह्यात पणन विभागातर्फे १०५ केंद्रांना धान्य खरेदीची मंजूरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४२ खरेदी केंद्र चालकांनी नाम मात्र उद्घाटन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात हव्या त्या प्रमाणात खरेदी सुरू झाली नसल्याने धान्य कुठे विकावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

भारतीय जनता पक्ष आक्रमक

तर याच मुद्द्याला घेऊन आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्य प्रक्रियेत मोठा घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे. तर, प्रत्यक्षात रब्बी हंगामात दरवर्षी १ मे ते ३० जून या कालावधीत धान्य खरेदी केली जाते, मात्र या वर्षी ही धान्य खरेदी कागदोपत्री मे महिना संपला तरी करण्यात आली नाही. तर, काल पर्यंत १५७ क्विंटल धान्याची आतापर्यंत खरेदी करण्यात आली असून लवकरात लवकर धान्य खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, तर आंदोलन छेडू असा इशारा भाजपने दिला आहे.

खरीप हंगामाचे नियोजन कुठून करावे हा प्रश्न

तर मागील खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यात ३२ लक्ष १३४ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. रब्बी हंगामात अंदाजे २९ लक्ष क्विंटल धान्य खरेदी केली जाऊ शकते, मात्र अद्यापही धान्य खरेदी केंद्र हवे त्या अपेक्षेने उघडण्यात आले नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत आला असून खरीप हंगामाचे नियोजन कुठून करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

हेही वाचा -रेल्वे पोलिसांचा यशस्वी तपास : हरवलेल्या 25 वर्षीय महिलेचा 2 दिवसांत शोध

ABOUT THE AUTHOR

...view details