गोंदिया -फत्तेपुर येथील फार्म हाउसच्या विहीरी जवळ चरत असलेली शेळी अचानक विहीरीत पडल्याने तीला वाचवण्यासाठी फार्महाउसची देखरेख करणारा कामगार गेला असता त्याचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया तालुक्यात घडली असून गंगाझरी पोलीस पूढील चौकशी करत आहेत.
विहीरीत पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या कामगाराचा मृत्यू - gondia crime news
फत्तेपुर येथील फार्म हाउसच्या विहीरी जवळ चरत असलेली शेळी अचानक विहीरीत पडल्याने तीला वाचवण्यासाठी फार्महाउसची देखरेख करणारा कामगार गेला असता त्याचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया तालुक्यात घडली असून गंगाझरी पोलीस पूढील चौकशी करत आहेत.
भारत पुराम (वय ४१ रा.फत्तेपुर) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली असता, घटनास्थळी गंगाझरी पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिम ने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी दोरीच्या सहाय्याने विहीरीमध्ये दिवा उतरविले असता तो दिवा विझला. त्यामुळे विहीरीमध्ये विषारी वायु असल्याचा अंदाज लावल्यानंतर खाटेच्या चारही बाजुला दोरीने बांधुन खाट विहीरीमध्ये टाकून मृतदेह खाटेच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला तसेच शेळीला लोखंडी गळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असुन गंगाझरी पोलिसांनी पंचनामा केला आहे. कामगाराचा मृत्यु कसा झाला? याचा तपास सुरु केला असुन गंगाझरी पोलिसांनी सध्या त्याची आकस्मीक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे.