महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोदरा देऊळगावत तेरवीच्या जेवणातून १८० लोकांना विषबाधा - तेरवीच्या जेवणतातून विष बाधा

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बोदरा देऊळगाव येथे तेरवीच्या जेवणातून १८० लोकांना वीस बाधा झाल.

तेरवीच्या जेवणातून विष बाधा
तेरवीच्या जेवणातून विष बाधा

By

Published : Jan 7, 2021, 10:00 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बोदरा देऊळगाव येथे तेरवीच्या जेवणातून १८० लोकांना वीषबाधा झाली. ६ तासाच्या उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी बोदरा या गावातील सरदास झोळे यांच्याकडे तेरवीचे कार्यक्रम असल्याने त्यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

डॉक्टर कुंदन कुलसंगे

१८० लोकांना विषबाधा-

या कार्यक्रमात गावातील लोकांनी हजेरी लावली व जेवणही केले. मात्र या जेवणातून १८० लोकांना विषबाधा झाली. अनेकांना उलटया हगवण आणि डोके दुखीचा असा त्रास सुरू झाला. त्यामुळे काही लोकांनी चान्ना बाकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करिता धाव घेतली. मात्र गावातील अनेक लोकांना हा त्रास जाणविल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात इतके लोकांचा उपचार करता येणार नाही. त्याकरिता गावातील जिल्हा परिषद शाळेतच डॉक्टर व त्यांची टीम शाळेत दाखल झाली व त्या रुग्णांवर उपचार करायला सुरवात केली.

सर्वांची प्रकृती स्थिर-

यामध्ये १० लोकांना अधिक त्रास झाल्याने त्यांच्यावर आज संध्याकाळ पर्यंत उपचार सुरू होते. दरम्यान, सर्व लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्तरांनी दिली आहे.

हेही वाचा-राष्ट्रवादीचे लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर; शरद पवारांनी घेतला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details