महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाई; लाखोंचा माल जप्त - अवैध दारू

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत मोहफुलाची हातभट्टी दारू गाळणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तब्बल १ लाख ११ हजार ६७५ रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

illegal liquor
पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाई; लाखोंचा माल जप्त

By

Published : Apr 8, 2020, 8:50 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना म्हणून, सरकारने संचारबंदी केली आहे. दरम्यान, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत मोहफुलाची हातभट्टी दारू गाळणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तब्बल १ लाख ११ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाई; लाखोंचा माल जप्त

ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत नागरा येथील आरोपी अरुण योगराज लिल्हारे, आसोली येथील भीमराव गुलाब बंसोड, कटंगटोला येथील रामेश्वर टिकाराम पटले, पांढराबोडी येथील उदरेश चयनलाल गराडे, आसोली येथील गौतम देवानंद बसंडो, कटंगीकला येथील बजरंग छोटेलाल कैथवास आणि शोभेलाल पेंढारू टेकाम, अशा एकूण ९ आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. सडवा मोहफूल पास, हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details