गोंदिया - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे परराज्यात अडकलेल्या मजूरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावी जाण्यासाठी मजूर लपून-छपून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. रेड झोन असलेल्या राज्यांतून अनेक मजूर गोंदियात प्रवेश करत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
रेड झोन असलेल्या राज्यांतून मजुरांचा महाराष्ट्रात चोरीछुपे प्रवेश; कोरोना संसर्गाचा धोका वाढला - लॉकडाऊन तिसरा टप्पा
कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावी जाण्यासाठी मजूर लपून-छपून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. रेड झोन असलेल्या राज्यांतून अनेक मजूर गोंदियात प्रवेश करत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद असल्यामुळे मध्यप्रदेशला जाणारे तेलंगाणा आणि छत्तीसगड येथून येणारे मजूर चोर मार्गाने गोंदियाला येत आहेत. त्यांच्या सोबत महिला आणि लहान मुलेही आहेत. तसेच तेलंगाणातून चंद्रपूरकडे येणार्या मजूरांचा लोंढा येणार्या काळात राज्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. महामार्गावर होणाऱया कडक तपासणीतून मार्ग काढत चोर मार्गाचा अवलंब करणारे हे मजूर राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.
परराज्यातून येणार्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन जनतेने घरातच राहून लॉकडाऊनच्या आदेशाचे पूर्ण पालन केले आहे व करत आहे. मात्र, बाहेरून येणारा मजुरांचा लोंढा थांबत नाही. त्यासाठी प्रशासनाने कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे.