महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; गोंदियामध्ये तीन दिवसात हत्येच्या दोन घटना - गोंदिया हत्या प्रकरण

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने आपल्या ५ वर्षीय मुलीसमोर गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना लपविण्यासाठी त्याने तिला स्वत: हॉस्पिटल येथे घेवून गेला असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

murder gondia
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; गोंदियामध्ये तीन दिवसात दोन हत्येच्या घटना

By

Published : Mar 6, 2020, 8:19 PM IST

गोंदिया -पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पाच वर्षीय मुलीसमोरच पतीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना गोंदिया शहरातील कुडवा येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरामध्ये तीन दिवसात ही दुसरी हत्येची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; गोंदियामध्ये तीन दिवसात दोन हत्येच्या घटना

हेही वाचा -शेतकऱ्याच्या घरात पाच लाखांची चोरी.. मुलांच्या लग्नासाठी जमवली होती रक्कम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने आपल्या ५ वर्षीय मुलीसमोर गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना लपविण्यासाठी त्याने तिला स्वत: हॉस्पिटल येथे घेवून गेला असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

आरोपीने पत्नीला पुन्हा घरी आणून मृत अवस्थेत ठेवून पसार झाला होता. मात्र, पोलीसांनी त्याचा शोध घेवून आरोपी पतीला अटक केली आहे. या अगोदर गोंदिया येथील मोर्वही गावात ३ मार्चला १० विचा पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या ३ दिवसात दुसरी घटना झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.

हेही वाचा -दर्यापूर येथे युवकाची भररस्त्यात हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details