महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात गारवा - rain

शहरात आज सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने जोर धरला.

गोंदियात अवकाळी पाऊस

By

Published : Mar 3, 2019, 12:31 PM IST

गोंदिया- शहरात आज सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने जोर धरला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

हवामान खात्याने २ आणि ३ मार्चला पावसाचा अंदजा वर्तवला होता. मात्र, आज सकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर १ ते २ तास मुसळधार पावसाने गोंदियासह जिल्ह्यातील आमगांव, तिरोडा, गोरेगांव, देवरी, या तालुक्यांतही हजेरी लावली.

गोंदियात अवकाळी पाऊस

आज रविवार असल्याने अनेकांना या अवकाळी पावसाचा त्रास सहन करावा लगलेला आहे. तसेच या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना ही मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच अनेक ठिकाणी धान्य खरेदी केंद्रावार शेतकऱ्यांचे धान्य उघाड्यावर असल्याने त्याचेही नुकसान झाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details