महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2020, 1:15 AM IST

ETV Bharat / state

'गोंदियातील गुजराती राष्ट्रीय माध्यमिक शाळा शैक्षणिक क्रांतीतील मैलाचा दगड'

येथील राष्ट्रीय केलवानी मंडळाव्दारा संचालित गुजराती राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संस्थांनी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी गाठत शंभर वर्षे पुर्ण केले आहे. यानिमित्त १ फेब्रुवारीला सुवर्ण शताब्दी महोत्सवाचे आयोजन येथील गुजराती नॅशनल हायस्कुलच्या पटांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते झाले.

Aanandiben patel in Gondia
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

गोंदिया- येथील राष्ट्रीय केलवानी मंडळाव्दारा संचालित गुजराती राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संस्थांनी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी गाठत शंभर वर्षे पुर्ण केले आहे. यानिमित्त १ फेब्रुवारीला सुवर्ण शताब्दी महोत्सवाचे आयोजन येथील गुजराती नॅशनल हायस्कुलच्या पटांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते झाले.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणुन अदानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी, कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पीटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रिती अदानी, लेखक व कलाकार पद्यश्री मनोज जोशी, गुजरातचे माजी आमदार जयंत पटेल, मनोहर भाई पटले अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्यासह अनेक उद्योगपती उपस्थित राहिले. ज्यांनी आपले योगदान देऊन या शिक्षण संस्थेला वटवृक्ष केले, त्यांची आठवण म्हणुन हा कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांचे यात मोठे योगदान आहे. त्यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असुन, जिल्ह्याचे नाव गौरवान्वित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details