महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया ते जम्मू-काश्मीर व्हाया वाघा बॉर्डर, पर्यावरणाचा संदेश देत युवकांची सायकलयात्रा - गोंदिया ते वाघा बॉर्डर व जम्मू-काश्मीर

गोंदिया येथील 'जेसिआय राईस सिटी व आज फोरम'ने १८ जुन २०१७ ला एक दिन सायकल के नाम असा उपक्रम चालू केला होता. यात प्रत्येक रविवारी १ तास तरी सायकल चालवावी व भविष्यात पेट्रोल व डिझेलची बचत व्हावी तसेच पर्यावरण वाचवावे, अशी संकल्पना आहे.

पर्यावरणाचा संदेश देत युवकांची सायकलयात्रा

By

Published : Nov 4, 2019, 9:42 AM IST

गोंदिया - 'एक दिन सायकलके नाम' या उपक्रमाअंतर्गत शहरातील 'जेसिआय राईस सिटी व आज फोरम' या ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी एक तास २० ते २५ किलोमीटर सायकल चालवली जाते. यात पेट्रोल व डिझेलची बचत करा व पर्यावरण वाचावा असा संदेश दिला जातो. या उपक्रमाला रविवारी (३ ऑक्टोबर) १२५ आठवडे पूर्ण झाले आहेत. याच ग्रुपमधील दोन सदस्यांनी गोंदिया ते वाघा बॉर्डर व जम्मू-काश्मीर असा सायकलने प्रवास सुरू केला आहे.

पर्यावरणाचा संदेश देत युवकांची सायकलयात्रा

गोंदिया येथील 'जेसिआय राईस सिटी व आज फोरम'ने १८ जुन २०१७ ला एक दिन सायकल के नाम असा उपक्रम चालू केला होता. यात प्रत्येक रविवारी १ तास तरी सायकल चालवावी व भविष्यात पेट्रोल व डिझेलची बचत व्हावी तसेच पर्यावरण वाचवावे, अशी संकल्पना आहे.

आपण नेहमी मोटारसायकल चालवत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, सायकल चालवत असल्याने इंधनाची बचत होत असल्याचा संदेश यात दिला जातो. आज या उपक्रमाला १२५ आठवडे पूर्ण होत असुन रविवारी गोंदियातील दोन युवकांनी गोंदिया ते वाघा बॉर्डर व जम्मू-काश्मीर असा ५ हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. ३५ दिवसांमध्ये पार करणार आहेत. दरदिवशी १५० किलोमीटर सायकल चालवून हा प्रवास पार करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details