महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी - गोंदिया

गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पोलीस शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या आणि आई-वडील किंवा स्वतःच्या व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी

By

Published : May 28, 2019, 4:20 PM IST

गोंदिया- गोंदिया पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पोलीस शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या आणि आई-वडील किंवा स्वतःच्या व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी

गोंदिया म्हटले की, नक्षल अशी भीती या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांच्या मनात असते. त्यातच कामाचा ताण आणि नक्षलग्रस्त भागात काम करताना न मिळणाऱ्या सुट्यांमुळे अनेक पोलीस मानसिक तणावात काम करतात. बहुदा आपल्या मुलांच्या वाढदिवसालाही उपस्थित राहू शकत नाहीत. याचा विपरीत परिणाम कामावर होत असल्याचे लक्षात घेऊन साहू यांनी वाढदिवसाची पोलिसांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करता येणार असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

त्यामुळे गोंदिया पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी राबविलेला अनोखा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लागू करावा, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस शिपायाला वाढदिवसाची संबंधित सूचना 8 दिवस अगोदर पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details