महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार - नाना पटोले - पटोले सेना-भाजप सरकारवर टिका

माजी खासदार आणि किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी महापर्दाफाश यात्रेच्या गोंदिया येथील सभेत राज्यातील सेना-भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महापर्दाफाश यात्रेच्या गोंदिया येथील सभेत बोलताना नाना पटोले

By

Published : Aug 29, 2019, 1:35 PM IST

गोंदिया -अमरावतीपासून सुरू झालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा गोंदियात आली आहे. यावेळी माजी खासदार नाना पटोले यांनी भाषणा दरम्यान सेना-भाजपवर जोरदार प्रहार केला. राज्यात सध्या असलेले सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर मोजक्याच व्यवसायिकांचे हितसंबंध जोपासणारे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महापर्दाफाश यात्रेच्या गोंदिया येथील सभेत राज्यातील सेना-भाजप सरकारवर नाना पटोले यांचा जोरदार प्रहार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी यात्रांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही महापर्दाफाश यात्रा सुरू केली आहे. कांग्रेसची ही महापर्दाफाश यात्रा बुधवारी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे दाखल झाली. यावेळी नाना पटोले यांनी स्वतः मोटारसायकल चालवत र‌ॅली काढली.

हेही वाचा... 'घालवूया लबाडांचे सरकार', काँग्रेस करणार 'महापर्दाफाश'

केंद्रातील आणि राज्यातील सरकार ही अदानी अंबानी यांच्याच सेवेत - पटोले

केंद्रांतील व राज्यातील सरकारे ही अदानी, अंबानी यांच्या सेवेसाठी काम करत आहे. या दोघांना मोठे करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लुटले जात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्रास कंपनीच्या हिताची आहे, काँग्रेसच्या काळात हा विमा सरकारी बँक काढत असे, मात्र आता या खाजगी विमा कंपन्यांनी एकाही शेतकऱ्याला लाभ दिला नाही. शासकीय योजनांचे खाजगीकरण होत आहे. आयुध निर्मानी संस्था, रेल्वे यांसारख्या सरकारी संस्था खाजगीकरणाच्या वाटेवर आहेत. बीएसएनएल सारखी देशव्यापी संस्था डबघाईला निघाली पण जिओ मात्र जोरात आहे. कारण हे सरकार काही शेतकऱ्यांचे नसून अदानी अंबानी यांचे सरकार असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी सभेतील जनतेला संबोधीत केला आहे.

हेही वाचा... फेल झालेल्या फडणवीस सरकारची पास होण्यासाठी 'जनादेश' यात्रा- नाना पटोले​​​​​​​

महापर्दाफाश यात्रेत लोक स्वयंस्फुर्तीने येतात...

मुख्यमंत्री यांच्या यात्रेत पैसे देऊन लोकांची गर्दी जमविण्यात आली मात्र काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत लोक स्वयंस्फूर्तीने आले असून जनता आता सत्ताधाऱ्यांने त्यांची जागा दाखवणार आहे, असे पटोले यावेळी म्हणाले

हेही वाचा...वडेट्टीवार व नाना पटोले यांच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसची महापर्दाफाश रॅली रद्द? चंद्रपूरमध्ये विविध चर्चांना उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details