मातृपितृ दिनानिमित्त : निरोगी जीवन व प्रदुषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी गोंदिया -डोंगरगड सायलकल वारी
निरोगी जीवन व प्रदूषणमुक्त वातावरणाचा संदेश २५ ते ३० युवक-युवतींचा संकल्प प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियाकरांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला आहे. आता हाच संदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने माँ बम्लेश्वरी धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ-पितृ दिवसानिमित्त १४ फेब्रुवारीला गोंदियातून २५ ते ३० युवक-युवती प्रवास करणार आहेत.
गोंदिया - दिवसेंदिवस वातावरणात बदल घडून येत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहेत. यासाठी विविध प्रकारचे प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवून उत्तम आरोग्य व निरोगी जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी गोंदियातील युवा वर्गाने आता कंबर कसली आहे. १४ फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ दिनानिमित्त गोंदियातील २५ ते ३० युवक-युवती सायकलने गोंदिया ते डोंगरगड असा प्रवास करून प्रदूषणमुक्तीचा संदेश देणार आहेत.
निरोगी जीवन व प्रदूषणमुक्त वातावरणाचा संदेश २५ ते ३० युवक-युवतींचा संकल्प प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियाकरांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला आहे. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी १० ते २० किलोमीटर सायकलने प्रवास करून प्रदुषणमुक्त जीवन व आरोग्याचा संदेश देण्यात येत आहे. आता हाच संदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाने माँ बम्लेश्वरी धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे मातृ-पितृ दिवसानिमित्त १४ फेब्रुवारीला गोंदियातून २५ ते ३० युवक-युवती प्रवास करणार आहेत.