गोंदिया - जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्हाळ्याला सुरवात झाली आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच तापमान ४३ अंश सेल्सिअसच्यावर नोंद झाली आहे. हे तापमान आणखीन वाढणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. सकाळी ११ वाजल्यापासूनच रस्त्यांवर कर्फ्यूसारखे वातावरण दिसत आहे. उन्हापासून संरक्षणासाठी लोकांची बर्फ, आईसक्रीम, निंबुपाणी व ज्युस गाड्यांवर गर्दी होत आहे.
गोंदियाचा पारा ४३ अंशावर; सकाळी ११ नंतरच रस्त्यांवर शुकशुकाट, ज्यूसच्या गाड्यांवर गर्दी - june
सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे.
यावर्षी उन्हाळा एप्रिल महिन्यापासूनच तापायला लागलेला आहे तसेच मे महिन्यात ४३ अंश सेल्सिअसच्यावर पारा गेला आहे. हा पारा आणखी वाढणार असल्याचे हवाना खात्याचे अंदाज दर्शविले आहे. तर यादी जिल्हा तापमान ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला आहे. सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे. त्यात यंदा मे महिना १५ दिवसा मध्येच ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने येत्या दीड महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उकाड्यामुळे मात्र सर्वांच्या जीव कासावीस झाला आहे. कधी या उकाड्यापासून सुटका केव्हा मिळते, याची सर्वच वाट बघत आहेत.
निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र वाढते सिमेंटचे जंगल आणि वृक्षांचे कमी होत चाललेले प्रमाण हे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतूचक्र व निसर्गावर सुध्दा याचा परिणाम होत आहे. पावसाळ्यात पाऊस पडत नाही. उन्हाळ्यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पर्यावरणाशी माणूस जो खेळ खेळत आहे त्याची प्रतीपूर्ती निसर्गाकडून केली जात आहे. उन्हाळ्यात कधी मे महिना तापत असताना आता मात्र मार्च महिन्यापासून सूर्यदेव आग ओकत आहेत. यंदाचीच स्थिती बघितल्यास एप्रिल महिन्यानेच सर्वांना होरपळून काढले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. यावरून मे महिन्यात पडणारी उन्ह आता त्यापूर्वीच पडू लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सध्यातरी ४३.८ अंश सेल्सिअस सर्वाधीक तापमान असले तरी मे आणि जून महिना शिल्लक आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे हवामान खात्याने निर्देश दर्शविले आहे. जिल्ह्यातील मागील २० वर्षांतील तापमानाचा अभ्यास केल्यास सन १९९८ मध्ये मे महिन्यात जिल्ह्यात ४७.५ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. तर सन २००३ मधील जून महिन्यातही ४७.५ एवढीच नोंद घेण्यात आली आहे. मात्र स्थिती बघता मे आणि जून महिना धोक्याचा दिसून येत आहे.