महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड मृत्यूमुखी; शेतकऱ्यांचे 70 हजारांचे नुकसान

केळवद या गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड मध्यरात्री बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्याचे ७० हजाराचे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरु आहे.

By

Published : Aug 5, 2019, 4:41 PM IST

बिबट्याचा हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड ठार झाले

गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद येथील शेतकरी केवळराम वालदे यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या व एक बोकड यांच्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडल्या. सकाळी-सकाळी जेव्हा केवळराम वालदे उठल्यावर शेळ्या सोडण्यासाठी गोठ्याकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. हे दृश्य पाहून तो वालदे यांना धक्का बसला.

बिबट्याचा हल्ल्यात 5 शेळ्या आणि 1 बोकड ठार झाले

शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर या घटनेने मोठे संकट निर्माण झाले आहे. वालदे यांचे जवळपास 70 हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कर्मचाऱयांना घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले. यापूर्वी अनेकदा या परिसरातील लोकांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रम शाळा, इळदा येथील आवार भिंतीवर बिबट्या बसुन असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details