महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंतरराज्यीय पाकिटमाराला केली अटक; गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई - gondia railway police action

गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल स्थानकावर होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी नेहमी कार्यरत असते. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एका चोरटा रेल्वेस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांशी जवळीक साधत त्या प्रवाशाचे पाकिट आणि नगद चोरून पसार होत असल्याने दिसून आले.

gambler arrested by railway police in gondia
आंतरराज्यीय पाकिटमाराला केली अटक

By

Published : Jan 21, 2020, 8:17 PM IST

Updated : Jan 21, 2020, 8:37 PM IST

गोंदिया - येथील रेल्वे स्थानकावर एका आंतरराज्यीय पाकीटमाराला रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. हा आरोपी मध्यप्रदेशातील आहे. पेटल उर्फ पहाडसिंग अहिवार असे त्याचे नाव आहे. पाकिट मारल्यावर तो पळ काढीत असताना त्याला जेरबंद करण्यात आले.

आंतरराज्यीय पाकिटमाराला केली अटक

गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल स्थानकावर होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी नेहमी कार्यरत असते. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एका चोरटा रेल्वेस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांशी जवळीक साधत त्या प्रवाशाचे पाकिट आणि नगद चोरून पसार होत असल्याने दिसून आले. आरोपी पहाडसिंग हा रात्रीच्या वेळी फलाट क्र. ३ आणि ४ वर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी बनून गर्दीत जाऊन गर्दीचा फायदा घेत होता. नेहमीप्रमाणे त्याने पर्स आणि नगद रोख चोरून येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात जमा केले. यानंतर पुन्हा रेल्वे स्थानकात आला. यानंतर आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची पर्स चोरून नागपूरपर्यंत गेला.

हेही वाचा -कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

रेल्वे पोलीसही त्याच्या मागावर होतेच. पहाडसिंग हा रेल्वेगाडी नागपूरला पोहचल्यानंतर येथील रेल्वेस्थानकावरही त्याने एका प्रवाशाची पर्स चोरली. यावेळी येथून तो बाहेर निघत असताना पोलिसांनी त्याची मोबाईलद्वारे शुटींग केली. तसेच त्याचा पाठलाग केला. तो रेल्वे स्थानकाबाहेर निघत असताना रेल्वे सुरक्षा दलाने त्याला पकडले आणि गोंदियात आणले. त्याची चौकशी केल्यानंतर कबुली देत या अगोदरही आपण अनेक प्रवाशांची पाकिटे आणि रक्कम चोरल्याची सांगितले. आरोपी पहाडसिंगने अनेक चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर तो हत्या आणि हत्येच्या कटातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Last Updated : Jan 21, 2020, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details