गोंदिया- ट्रॅक्टर नाल्यात उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून चौघा मजूरांचा मृत्यू झाला असून इतर मजूर किरकोळ जखमी झाले आहे. नाल्यात पडलेला ट्रॅक्टर अंगावर पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मजूराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
गोंदियात ट्रॅक्टर नाल्यात उलटला; चाकाखाली दबून चौघांचा मृत्यू - tracter
ट्रॅक्टर नाल्यात उलटल्याने चाकाखाली दबून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका मजूराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
ट्रॅक्टर नाल्यात
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावाजवळ भात लावणीच्या कामासाठी मजूर ट्रॅक्टरमधून जात होते. यावेळी ट्रॅक्टर नाल्यात उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मजूराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्ये एकूण 13 ते 14 मजूर असल्याचे कळत असून इतर मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.