गोंदिया - तेढवा ते कासा रोडवरील तेढवा नदी घाटावर मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराच्या पथकावर दगडफेत करण्यात आली. याप्रकरणी वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायब तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांची दगडफेक, ९ जणांवर गुन्हा दाखल - गोंदिया वाळू माफिया
तेढवा ते कासा रोडवरील तेढवा नदी घाटावर मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराच्या पथकावर दगडफेत करण्यात आली.
नायब तहसीलदार सचिन पाटील हे आपल्या पथकासह तेढवा रेती घाट परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना त्यांना काही लोक दिसले. सोबतच टिप्पर (एमएच ३१ एजी २३३१) होता. ते टिप्परमध्येही वाळू भरत होते. यावेळी वाहन जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व नायब तहसीलदार यांना 9 जणांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक केली. अधिकाऱ्यांनी वाळूचे 3 ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
साहित्य जप्त करत असताना हमालांनी व चालकांनी पथकातील अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी 9 जणांवर भादंविच्या कलम ३९५, ३५६, ३४१, ३७९, ४२७, ५०४, ५०६, सहकलम २१ (१) (२) (३) (४) (५) गौण खनिज अधिनियामान्वये गुन्हा दाखल केला आहे.