गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचले आहे. येथील मोक्षधाम परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. हा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची होती. पण परिषद याकडे दुर्लक्ष करत होती. त्यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोक्षधाम परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली. आज या मोहिमेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आज मोक्षधामला गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
स्मशानाचं सोनं झालं..! लोकसहभागातून मोक्षधामाचा कायापालट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि त्यांनतर गोंदियात पोहचले मोक्षधामपर्यंत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोक्षधाम परिसरात मागील तीन वर्षांपासून राबवितात स्वच्छ भारत अभियान मोहीम
गोंदिया शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मोक्षधाम परिसरात गेल्या तीन वर्षापासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या या मोहिमेत नागरिक, अधिकारी यांच्यासह अनेक सामाजिक संघटनादेखील सहभागी होत होत्या. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी हे सर्व स्वच्छताप्रेमी या ठिकाणी एकत्र येऊन दोन तास श्रमदान करतात.
आता याच मोक्षधामात सर्व समाज मोक्ष धाम सेवा समितीची निर्मिती करण्यात आली आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या ७३ जाती धर्माचे अध्यक्ष आणि सचिव हे या समितीचे सदस्य असून या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्याबरोबरच या मोक्षधाममध्ये सीसीटीव्ही कॅमरेसुद्धा लावण्यात आले आहेत.