गोंदिया -जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सोनेखारी-जांभुरटोला मार्गावर पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून नवीन पूल व रस्ता बनविण्यात आला. मात्र, तो निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून तयार करण्यात आला असून पाहिल्या पावसाने या रस्त्यावर खडे पडले आहेत. या खड्यात पडून मोटरसायकलने जात असलेल्या लक्ष्मीचंद बोपचे या २५ वर्षीय युवकाचा या मृत्यू झाला आहे.
पूलावरील खड्ड्यात पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यु; कंत्राटदारासह अभियंत्यावर कारवाईची मागणी
लक्ष्मीचंद बोपचे असे मृत युवकाचे नाव असून तो मृत लक्ष्मीचंद बोपचे हा आमगाव तालुक्यातील सोनेखारी येथील रहिवासी आहे. लक्ष्मीचंदच्या मृत्यूला पूल तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंता जबाबदार असल्याचा आरोप गावकरी व लक्ष्मीकांतच्या नातेवाईकांनी केला आहे
मृत लक्ष्मीचंद बोपचे हा आमगाव तालुक्यातील सोनेखारी येथील रहिवासी आहे. तो आमगाव येथे एका कंपनीत काम करतो. तो शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास जांभुरटोला-पिपरटोला मार्गाने आपल्या गावाकडे दुचाकीवर जात होता. पिपरटोला परिसरात तयार करण्यात आलेल्या नवीन पुलाच्या मध्य भागी पावसामुळे मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे लक्ष्मीचंदला तो रात्रीच्या अंधारात दिसला नाही. त्यामुळे तो मोटारसायकलसह खड्ड्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लक्ष्मीचंदच्या मृत्यूला पूल तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंता जबाबदार असल्याचा आरोप गावकरी व लक्ष्मीकांतच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करून मृताच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी, अशी मागणी गावकरी व नातेवाईक करत आहेत.