गोंदिया - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. याचाच फायदा घेत गोंदियातील वसंत नगर भागात राहणाऱ्या नीकू लिल्हारे या व्यक्तीच्या घरी गॅसचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. भरलेल्या सिलेंडरमधून खाली गॅस सिलेंडरमध्ये मशीनच्या साहाय्याने गॅस भरताना ११ आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. १२० गॅस सिलिंडरसह तीन चारचाकी वाहने आणि ११ आरोपींना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे तुमच्या घरी गॅस एजन्सीमार्फत आणून देत असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस कमी तर नाही ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
सिलिंडरमधून गॅसचोरी करणे पडले महागात; ११ आरोपींना अटक - गोंदिया न्यूज
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असून १२० गॅस सिलिंडर, तीन चारचाकी टाटा एस गाड्या, गॅस भरण्याचे साहित्य तसेच या गाड्यावरील लोक, गॅस भरून देणारा मालक आणि त्यांचे सहकारी असे एकूण ११ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे
गोंदिया गुन्हे शाखा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोंदियाच्या गणेश नगर भागात असलेल्या अरविंद गॅस एजन्सीचे 3 चारचाकी वाहने वंसत नगर भागातील एका घरी मागच्या बाजूला उभे असून त्या ठिकाणी भरलेल्या गॅस सिलिंडरमधून खाली गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून खुल्या बाजारात वाढीव दरात विक्री केला जात असे.